Amazon Prime Video हे भारतातील एक अतिशय लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म बनले आहे. यावर अनेक चांगल्या वेबसिरीज आणि चित्रपट उपलब्ध आहेत. गतवर्षी महाग झाल्यानंतर अनेकजण त्याचे सब्सक्रिप्शन घेत नाहीत. पण, इथे आम्ही तुम्हाला Airtel चे काही प्रीपेड प्लान सांगत आहोत, ज्यात तुम्हाला Amazon Prime चे फ्री सब्सक्रिप्शन मिळेल.
एअरटेलचा ९९९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन
एअरटेलच्या 999 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनसह, वापरकर्त्यांना दररोज 2.5GB डेटा दिला जातो. त्याची वैधता 84 दिवस आहे. यामध्ये यूजर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉल्ससोबत दररोज १०० एसएमएस देखील दिले जातात. या प्लॅनसह, Amazon प्राइम मेंबरशिप देखील वापरकर्त्यांना 84 दिवसांची कंपनी देते.

एअरटेलचा ६९९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन
एअरटेलच्या 699 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज 3GB हाय-स्पीड डेटा दिला जातो. यासोबतच 56 दिवसांसाठी Amazon Prime चे सबस्क्रिप्शन देखील युजर्सना दिले जाते. या प्लॅनची वैधता देखील 56 दिवसांची आहे. यामध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉल्स आणि दररोज 100 एसएमएस देखील दिले जातात.
एअरटेलचा 359 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
एअरटेलचा 359 रुपयांचा प्रीपेड प्लॅन दररोज 2GB डेटासह येतो. या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉल्स आणि दररोज १०० एसएमएस देखील दिले जातात. या प्लॅनमध्ये देखील तुम्हाला 28 दिवसांसाठी Amazon Prime Mobile Edition चे सबस्क्रिप्शन मिळेल.
एअरटेलचा 108 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
एअरटेलचा 108 रुपयांचा प्लॅन एक अॅड-ऑन पॅक आहे. हे इतर प्रीपेड प्लॅनसह घेतले जाऊ शकते. यामध्ये यूजर्सना 6GB डेटा मिळतो. यामध्ये कंपनी प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशनचे ३० दिवसांसाठी सबस्क्रिप्शन देते.