Warning for Chrome users: सरकारी यंत्रणेने क्रोम वापरकर्त्यांसाठी चेतावणी (Warning for Chrome users) जारी केली आहे. भारत सरकारच्या एजन्सीने याबाबत इशारा दिला आहे. कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (Computer Emergency Response Team) ने क्रोमसह काही मोझिला (Mozilla) उत्पादनांबाबत चेतावणी देखील जारी केली आहे.
CERT-In ने अहवाल दिला आहे की, Chrome आणि Mozilla च्या काही उत्पादनांमध्ये त्रुटी असल्यामुळे हॅकर्स (Hackers) वापरकर्त्यांच्या डेटामध्ये प्रवेश मिळवू शकतात. यामुळे, ते सर्व सुरक्षा यंत्रणा बायपास करू शकतात आणि अनियंत्रित कोड कार्यान्वित करू शकतात.

CERT-In ने या त्रुटींना उच्च-जोखीम म्हणून चिन्हांकित केले आहे. यामध्ये Chrome OS आवृत्ती 96.0.4664.209 पूर्वीच्या आवृत्त्यांचा समावेश आहे. टेक दिग्गज Google ने सांगितले की, त्यांनी या सर्व त्रुटी शोधून काढल्या आहेत आणि त्या दूर केल्या आहेत.
कंपनीने वापरकर्त्यांना नवीनतम Chrome OS आवृत्ती डाउनलोड करण्यास सांगितले आहे जेणेकरून ते या बग्सपासून सुरक्षित राहू शकतील. याशिवाय CERT-In ने iOS आवृत्ती 101 पूर्वी Mozilla Firefox, आवृत्ती 91.10 पूर्वी Mozilla Firefox Thunderbird, आवृत्ती 91.10 पूर्वी Mozilla Firefox ESR आणि 101 पूर्वी Mozilla Firefox मधील त्रुटींबाबत चेतावणी दिली आहे.
Mozilla ने या सर्व त्रुटींना उच्च दर्जा दिला आहे. या त्रुटींमुळे दूरस्थ हल्लेखोर सुरक्षा निर्बंधांना बायपास करू शकतात. याशिवाय ते संवेदनशील माहिती घेऊन अनियंत्रित कोड (Uncontrolled code) कार्यान्वित करू शकतात. हॅकर्स लक्ष्यित प्रणालीवर देखील हल्ला करू शकतात.
Mozilla ने याबाबत अपडेट जारी केले आहे. हे टाळण्यासाठी वापरकर्त्यांना Mozilla Firefox iOS 101, Mozilla Firefox Thunderbird आवृत्ती 91.10, Mozilla Firefox ESR आवृत्ती 91.10 आणि Mozilla Firefox आवृत्ती 101 डाउनलोड (Download) करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.