कोरोना महामारीपेक्षा ७ पट अधिक धोकादायक महामारी येण्याचा इशारा !

Marathi news

Marathi news : संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोना महामारीपेक्षा ७ पट अधिक धोकादायक महामारी येण्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेसह (डब्ल्यूएचओ) अन्य विशेषज्ज्ञांनी दिला आहे.

डब्ल्यूएचओ या संभाव्य महामारीला ‘डिसीज एक्स’ असे नाव दिले आहे. या महामारीमुळे पाच कोटींहून अधिक लोकांचा मृत्यू होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे कोरोना महामारीपेक्षा पुढची महामारी सातपट अधिक गंभीर ठरू शकते, असा इशारा ब्रिटनच्या लस कृती दलाच्या अध्यक्ष डेम केट बिघम यांनी दिला आहे.

डब्ल्यूएचओने या संभाव्य महामारीला ‘डिसीज एक्स’ असे नाव दिले आहे. तसेच ही महामारी शक्यतो अगोदरच वाटेवर असण्याचा इशारा डब्ल्यूएचओने दिला आहे. आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार कोरोना महामारीने जगभरात जवळपास ७ लाख जणांचा बळी घेतला आहे.

पण संभाव्य महामारीमुळे जगभरात जवळपास पाच कोटींहून अधिक बळी जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. संभाव्य महामारी ही सध्या अस्तित्वात असलेल्या विषाणूमुळे पसरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe