Weight loss : डेस्क जॉबमुळे सध्या लठ्ठपणा ही सर्वात मोठी आणि सामान्य समस्या बनली आहे. अशातच बरेच लोक वजन कमी करण्यासाठी, जिममध्ये तासनतास घाम गाळतात आणि विविध आहार देखील फॉलो करतात. पण एवढं सगळं करूनही फरक जाणवत नाही. अशातच काही लोक वजन कमी करण्यासाठी दुग्धजन्य पदार्थांचे सेवन पूर्णपणे बंद करतात. पण असे केल्यास तुमची हाडे कमकुवत होण्यासोबतच त्वचेच्या समस्या आणि पचनाच्या समस्याही उद्भवू शकतात.
या समस्या टाळण्यासाठी दुग्धजन्य पदार्थ आहारात ठेवणे फार महत्वाचे आहे. तुम्ही दुग्धजन्य पदार्थ आहारात ठेवून देखील तुमचे वजन कमी करू शकता. होय आज आम्ही त्याबद्दलच सांगणार आहोत. बहुतेक लोकांच्या मनात हा प्रश्न असतो की वजन कमी करताना दुग्धजन्य पदार्थांचे सेवन कसे करावे, जेणेकरून वजन कमी होईल आणि शरीराला ताकदही मिळेल. चला तर मग…

दही
वजन कमी करण्यासाठी दह्याचा आहारात समावेश केला जाऊ शकतो. दह्यामध्ये कॅल्शियम भरपूर असण्यासोबतच याच्या सेवनाने पचनसंस्थाही निरोगी राहते. वजन कमी करण्यासाठी, दही नाश्ता किंवा दुपारच्या जेवणात खाऊ शकतो. दह्याचे सेवन केल्याने त्वचाही चमकदार होते आणि शरीरातील सूज कमी होते.
पनीर
पनीर शरीरासाठी खूप फायदेशीर मानले जाते. यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन बी12 आणि प्रोटीन आढळतात. याच्या सेवनाने स्नायू तयार होण्यास मदत होते आणि वजनही कमी होते. पनीरमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते. अशा स्थितीत याचे सेवन केल्याने जास्त वेळ भूक लागत नाही आणि वजनही कमी होते. हे चयापचय देखील वाढवते.
प्रोबायोटिक्सचे सेवन
वजन कमी करण्यासाठी प्रोबायोटिक्सचे सेवन देखील केले जाऊ शकते. पोट निरोगी ठेवण्यासोबतच प्रोबायोटिक्समुळे जळजळही कमी होते. प्रोबायोटिक पदार्थांमध्ये ग्रीक दही वापरता येते. हे चयापचय वाढवते आणि शरीर निरोगी ठेवते.
चीज
वजन कमी करण्यासाठी तुम्ही चीजचे सेवन देखील करू शकता. पण चीज खाताना ते मर्यादित प्रमाणातच खाण्याची विशेष काळजी घ्या. चीजमध्ये प्रोटीन असते. अशा स्थितीत याचे सेवन केल्यावर तुम्हाला जास्त वेळ भूक लागणार नाही आणि तुमचे वजन कमी होईल. तुम्ही मेयोनेझचे सेवन करत असाल तर त्याऐवजी चीज वापरू शकता.