India News : आजकाल अनेकांकडे चारचाकी वाहने आहेत. आपण बऱ्याच वेळा यातूनच प्रवास करत असतो. जर तुमचा लांबचा प्रवास असेल तर आवश्यक ती सर्व काळजी आपण घेतोच. पण कधी कधी पूर्ण काळजी घेऊनही आपण अनपेक्षित अडचणीत आपल्या घेरतात.
यातील एक अनपेक्षित समस्या म्हणजे गाडीत अडकणे. अशी कप्लना करा की, जर तुम्ही गाडीत अडकला असाल आणि बाहेर पडण्यासाठी काच फोडायची असेल तर बाजूला असणाऱ्या खिडकीची काच फोडणे चांगले राहील. खरं तर,
बाजूच्या खिडकीची काच विंडशील्डपेक्षा पातळ आणि कमकुवत असते, ज्यामुळे ती तोडणे सोपे होते. शिवाय विंडशील्डपेक्षा ही स्वस्त देखील आहे. अशावेळी खिडकीची काच फोडून नवीन काच लावल्यास तुमचा खर्च कमी होईल.
तथापि, साइड विंडो तोडण्यासाठी आपण इमरजेंसी सुरक्षा हातोडा वापरू शकता, जे आपण ऑनलाइन खरेदी करू शकता. पण जर तुमच्याकडे इमर्जन्सी सिक्युरिटी हॅमर नसेल आणि तुम्ही गाडीत अडकलात तर? अशावेळी सर्वप्रथम शांत राहावे लागेल जेणेकरून आरामात बाहेर पडण्याचा विचार करता येईल. भीतीपोटी काच फोडण्याचा प्रयत्न करू नका, तुम्ही जखमी होऊ शकता.
अशा वेळी सीट हेडरेस्ट आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. आपल्याला सीटवरून हेडरेस्ट काढून धातूचा भाग खिडकीच्या कोणत्याही काठाजवळ ठेवावा लागेल आणि जोरात दाबावे लागेल. एकाच वेळी ग्लास फुटत नसेल तर पुन्हा प्रयत्न करा. असा दाब लावता येत नसेल तर काचेला जोरात मारा. जेणे करून प्रेशर पडून काच फुटेल.
याशिवाय सीट बेल्टही तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. खिडकी तोडण्यासाठी तुम्ही सीटबेल्टचा मेटलच्या भाग वापरू शकता. खिडकीच्या काठावर ठेवून आणि जोरदार दाब देऊन काच फोडता येईल. तथापि, हेडरेस्टच्या तुलनेत काच फोडणे थोडे अधिक कठीण होईल.
* इमरजन्सी सेप्टी हॅमर गाडीत ठेवा
गाडीतून बाहेर कसे पडावे हे आपण वर पहिले. परंतु त्यापेक्षा महत्वाचे आहे सेप्टी हॅमर. आपल्या वाहनात सेप्टी हॅमर नक्की ठेवत चला. ते ऑनलाईन देखील भेटते. कारमधील काच फोडण्यासाठी किंवा इतर इमर्जन्सी कामासाठी त्याचा योग्य वापर करावा.