Ajab Gajab News : सर्वात जास्त पगार कोणत्या देशात मिळतो ?

Published on -

Ajab Gajab News : अमेरिका ही एकमेव महासत्ता आहे, हे आपण जाणतोच. त्याचबरोबर युरोपमधील आणखी अनेक देश आहेत की जे विकसित आणि धनाढ्य देश मानले जातात. या देशांमध्ये जाऊन नोकरी करण्याची जगभरातील नागरिकांची इच्छा असते.

याचे एकमेव कारण म्हणजे या देशांमध्ये मिळणारा गलेलठ्ठ पगार. पण तुम्हाला ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल की कर्मचाऱ्यांना सर्वाधिक पगार देणाऱ्या देशांच्या यादीत टॉप टेनमध्ये अमेरिकेचा समावेश नाही. या यादीत अव्वल स्थानी आहे स्वित्झर्लंड हा देश.

जागतिक अर्थव्यवस्थेत अव्वल स्थानी अमेरिका आहे. मात्र असे असूनही कर्मचाऱ्यांना सर्वाधिक पगार देण्याऱ्या देशांच्या क्रमवारीत अमेरिका पिछाडीवर आहे. ‘वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स’ च्या माहितीनुसार मासिक सरासरी वेतनाबाबतीत युरोपमधील स्वित्झर्लंड या देशाने बाजी मारली आहे.

या देशात नोकरदारांना एका महिन्याला साधारण ६ हजार २९८ डॉलर म्हणजेच जवळपास ५ लाख २१ हजार ८९४ रुपये इतका पगार आहे. या क्रमवारीमध्ये स्वित्झर्लंडपाठोपाठ लक्झेम्बर्ग या देशाचा नंबर लागतो.

या देशात नोकरदारांना सरासरी ५ हजार १२२ डॉलर इतका पगार मिळतो. तर, तिसऱ्या स्थानावर सिंगापूर या आशियाई देशाचा समावेश असून, येथे महिन्याला सरासरी ४ हजार ९९० डॉलर इतका पगार मिळतो.

जगातील विकसित देशांची अर्थव्यवस्था भक्कम असली तरीही यापैकी कोणत्याही देशाला पहिल्या तीन स्थानांमध्येही बाजी मारता आलेली नाही. कारण, अमेरिकासुद्धा या यादीत चौथ्या स्थानावर आहे. या देशातील सरासरी मासिक वेतन ४ हजार ६६४ डॉलर म्हणजेच सुमारे चार लाख रुपयांच्या आसपास आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe