जगात कोणता धर्म सगळ्यात वेगाने वाढतोय? कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का

Published on -

जगभरात सुमारे 300 धर्म असल्याचे सांगितले जाते. त्यात ख्रिश्चन, इस्लाम, हिंदू आणि त्यानंतर बौद्ध धर्माचा क्रमांक लागतो, असे सांगितले जाते. परंतु जगभरात धर्म वाढण्याचा वेग पाहिला तर एक धर्म असा आहे, जो विलक्षण वेगाने वाढतोय. अमेरिकास्थित प्यू रिसर्च सेंटरचे म्हणणे आहे, की जर मुस्लिम लोकसंख्या वाढण्याचा ट्रेंड असाच चालू राहिला तर तो काळ दूर नाही जेव्हा ते जगातील सर्वात मोठे होतील. जगात मुस्लिम लोकसंख्या एवढ्या वेगाने वाढत आहे, की हा वेग कायम राहिला तर, 2070 पर्यंत जगात इस्लाम धर्माचे अनुयायी सर्वाधिक असतील.

काय म्हणते रिसर्च सेंटर?

प्यू रिसर्च सेंटरच्या एका अहवालानुसार 2060 पर्यंत जगभरातील मुस्लिमांची एकूण लोकसंख्या 2015 च्या तुलनेत 70 टक्क्यांनी वाढेल. सध्या ख्रिश्चन धर्म हा जगातील प्रमुख धर्मांमध्ये सर्वात मोठा आहे. ज्याचे अनुयायी दोन अब्जाहून अधिक आहेत. एका अहवालानुसार २०२० पर्यंत जगात 2.38 अब्ज म्हणजेच सुमारे 238 कोटी लोक ख्रिश्चन धर्माचे पालन करत होते. इस्लाम धर्माचे अनुयायी 191 कोटी होते. त्याच वेळी हिंदू धर्माचे अनुयायी 116 कोटी होते. मुस्लिम लोकसंख्या असलेल्या देशांबद्दल बोललो, तर इंडोनेशिया पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर पाकिस्तान, भारत आणि बांगलादेशमध्ये मुस्लिमांची संख्या क्रमाने जास्त आहे.

खतरनाक आहे शिक्षा

कोणत्या धर्मात जास्त धर्मांतर होते, हे सांगणे कठीण आहे. कारण काही देशांमध्ये, जेव्हा राष्ट्रीय जनगणना केली जाते तेव्हा लोकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारले जात नाही. जरी तुम्हाला तुमच्या धर्माबद्दल विचारले तरी, तुम्ही तुम्ही धर्मांतर केले आहे का, असे विचारले जात नाही. काही देशांमध्ये कायदेशीर आणि सामाजिक परिणामांमुळे धार्मिक धर्मांतर कठीण होते. काही मुस्लिम देशांप्रमाणे, इस्लाम सोडल्यास मृत्युदंडाची शिक्षा आहे.

अमेरिकेतही होते धर्मांतरण

न्यू यॉर्क टाईम्सच्या मते, 25 टक्के अमेरिकन मुस्लिम हे इतर धर्मातून धर्मांतरित झालेले आहेत. दरवर्षी ब्रिटनमध्ये सुमारे 6000 लोक इस्लाम स्वीकारतात. एका अहवालानुसार, ब्रिटनमध्ये इस्लाम धर्म स्वीकारणाऱ्यांमध्ये बहुतेक महिला होत्या. द हफिंग्टन पोस्टनुसार, असा अंदाज आहे की दरवर्षी अंदाजे 20000 अमेरिकन लोक इतर धर्मातून इस्लाम स्वीकारतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News