Ram Ram : आजचा दिवस हिंदू सनातन धर्मांसाठी खूपच महत्त्वाचा होता. आज सियावर रामचंद्रजी अयोध्या येथील भव्य राम मंदिरात विराजमान झाले आहेत. श्रीक्षेत्र अयोध्या येथील राम मंदिरात आज प्रभू श्री रामजींच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होता.
आज अयोध्या येथील प्रभू श्री रामजींचे मंदिर राष्ट्राला समर्पित झाले आहे. तथापि, या मंदिरात आज सर्वसामान्य राम भक्तांना दर्शन घेता आलेले नाही. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आलेल्या पाहुण्यांच्या सुरक्षिततेसाठी राम मंदिर आवारात सर्वसामान्यांना एन्ट्री नव्हती.

परंतु या मंदिरात उद्यापासून दर्शन घेता येईल असा दावा केला जात आहे. दरम्यान राम मंदिरात प्रभू श्री रामराया विराजमान झाले असल्याने जगातील तमाम रामभक्तांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. सध्या संपूर्ण देशात धार्मिक उत्साहाचे वातावरण आहे.
राममय वातावरणात आजचा दिवस मावळला आहे. खरे तर प्रभू श्री रामरायांच्या नावातच एवढी ताकत आहे की रामनाम जपल्याने असंख्य पीडा दूर होतात. तुलसीदासजींनी रामचरितमानसमध्ये म्हणतात की भगवंताच्या सर्व प्रचलित नावांमध्ये राम हे नाव सर्वात जास्त फळ देणारे आहे.
राम हे नाव सर्वात सोपे आणि सुरक्षित आहे. याचा जप केल्याने व्यक्ती निश्चितपणे आपले ध्येय साध्य करते. मात्र हिंदू सनातनी लोक अभिवादन करताना राम-राम असं दोनदा म्हणतात. आता साहजिकच प्रभू श्री रामरायांचे दोनदा नाव घेण्याचे कारण काय हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात उपस्थित होतो.
दरम्यान आज आपण रामरायांचे दोनदा नाव घेण्याचे कारण काय, म्हणजेच राम-राम म्हणण्याचे नेमके कारण काय याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हिंदी परिभाषेनुसार राम या शब्दाचे पहिले अक्षर म्हणजे ‘र’ सत्ताविसाव्या स्थानावर येते. तर ‘आर’ बरोबर प्रमाणाच्या रूपात दिसणारे दुसरे अक्षर ‘आ’ दुसऱ्या स्थानी आणि ‘म’ पंचविसाव्या स्थानी येते.
अशाप्रकारे, हे सर्व जोडले तर ते 108 होते. र (27)+आ (2)+म (25)= राम (54) : र (27)+आ (2)+म (25) = राम (54) म्हणजे राम-राम (108) होत. दरम्यान हिंदू सनातनी लोक मंत्राचा जाप करताना कोणत्याही मंत्राचे 108 वेळा पठण करतात. म्हणजेच मंत्राचा 108 वेळा उच्चार केला जातो.
जपमाळ करताना प्रत्येक मणीला स्पर्श केला जातो अन मंत्र म्हटला जातो, एका माळीत 108 मणी असतात, म्हणजे मंत्राचा १०८ वेळा जप/उच्चार केला जातो तेव्हा एक जप पूर्ण होतो. पण ‘राम-राम’ हा शब्द इतका चमत्कारिक आहे की नुसता बोलून राम नामाचा जप १०८ वेळा केला जाऊ शकतो. म्हणजेच ‘राम-राम’ एकत्र म्हणणे म्हणजे जपमाळ जपण्यासारखे आहे. हेच कारण आहे की हिंदू सनातनी लोक अभिवादन करताना राम-राम असे म्हणतात.