अशी ऑफर पुन्हा मिळणार नाही ! Tata च्या गाड्यांवर ६५ हजार रुपयांपर्यंत सूट…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :-  डिसेंबर महिन्यात टाटा मोटर्सच्या गाड्यांवर शानदार डिस्काउंट ऑफर केला जात आहे. या गाड्यावर ६५ हजार रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.(Tata cars)

कंपनीच्या Tata Harrier, Safari, Tiago, Tigor, Nexon आणि Nexon EV या कारवर सूट दिली जात आहे. सर्वात जास्त डिस्काउंट टाटा हॅरियरवर दिला जात आहे.

दरम्यान, १ जानेवारी पासून टाटाच्या कारच्या किंमती वाढणार आहेत. त्यामुळे स्वस्त किंमतीत कार खरेदी करण्याची हीच योग्य वेळ आहे.

Tata Tiago आणि Tigor :- वर सूट Tata Tiago आणि Tigor वर डिसेंबर मध्ये अनुक्रमे ३५ हजार रुपये आणि ३० हजार रुपयाची सूट मिळत आहे. यात १० हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट आणि १५ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बेनिफिटचा समावेश आहे. टिगोरच्या कॉर्पोरेट खरेदीदारांना अतिरिक्त १० हजार रुपये मिळू शकते. तर टियागोच्या कॉर्पोरेट खरेदीदारांना ५ हजार रुपयाची सूट

Tata Harrier आणि Safari वर सूट :- टाटा हॅरियर एसयूव्ही वर ६५ हजार रुपयांपर्यंत सूट ऑफर केली जात आहे. यात ४० हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बेनिफिट आणि २० हजार रुपयाचे कॉर्पोरेट डिस्काउंटचा समावेश आहे. यावर कोणत्याही प्रकारचा कॅश डिस्काउंट मिळत नाही. ही स्कीम डार्क एडिशनला सोडून हॅरियरच्या सर्व व्हेरियंट्समध्ये उपलब्ध आहे. टाटा सफारीवर डिसेंबर मध्ये ४० हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बेनिफिट

Tata Nexon आणि Nexon EV वर सूट :- डिसेंबर महिन्यात टाटा नेक्सॉन कॉम्पॅक्ट एसयूव्ही वर २५ हजार रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. यात १५ हजार रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. यात १५ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बेनिफिट आणि १० हजार रुपयाचे कॉर्पोरेट डिस्काउंटचा समावेश आहे. टाटा नेक्सॉनची किंमत ७.२९ लाख रुपयांपासून सुरू होऊन १३.३४ लाख रुपयांपर्यंत जाते. याच पद्धतीने नेक्सॉन ईव्हीवर १५ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe