झोप ही आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. पुरेशी झोप मिळाली नाही तर तणाव, थकवा, चिडचिड, स्मरणशक्ती कमी होणे आणि विविध आरोग्य समस्या निर्माण होतात. काही लोकांना कमी झोप आवश्यक वाटते तर काहींना अधिक झोप लागते. मात्र, वयानुसार शरीराला आवश्यक असलेली झोप किती असावी, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
झोप ही आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. वयानुसार आवश्यक झोप घेणे मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. कमी झोपेमुळे तणाव, चिडचिड, हृदयरोग, लठ्ठपणा आणि अन्य आजार होऊ शकतात.

झोपेचे वयानुसार महत्त्व
नवजात बाळांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाला पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे. झोपेच्या अभावामुळे हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, मानसिक तणाव यासारख्या गंभीर समस्यांचा धोका वाढतो. अनेक लोक वय वाढल्यास झोपेची गरज कमी होते असे मानतात, पण तज्ज्ञांच्या मते झोपेची गरज ही वयानुसार बदलते पण ती पूर्ण होणं अत्यावश्यक असतं. झोपेची गरज ठरवण्यासाठी काही वैज्ञानिक पॅरामीटर्स निश्चित करण्यात आले आहेत.
वयानुसार किती तास झोपले पाहिजे ?
तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक वयोगटातील लोकांसाठी वेगवेगळी झोपेची गरज असते. खालीलप्रमाणे वयानुसार झोपेचे तास निश्चित करण्यात आले आहेत: नवजात बाळे (0-3 महिने): 14-17 तास, 4-7 महिने वयोगटातील बाळे: 12-15 तास , 1-2 वर्षे वयोगटातील मुले: 11-14 तास , 3-5 वर्षे वयोगटातील मुले: 10-13 तास , 6-13 वर्षे वयोगटातील मुले: 9-11 तास , 14-17 वर्षे वयोगटातील मुले: 8-10 तास , 18-25 वर्षे वयोगटातील तरुण: 7-9 तास , 26-64 वर्षे वयोगटातील लोक: 7-9 तास , 65 वर्षे आणि त्याहून अधिक वय असलेले: 7-8 तास
चांगल्या झोपेचे फायदे
मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर: योग्य झोप घेतल्याने मानसिक तणाव कमी होतो, एकाग्रता वाढते आणि स्मरणशक्ती सुधारते. झोपेच्या अभावामुळे चिंता, नैराश्य आणि भावनिक असंतुलन होऊ शकते.
हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाची: पुरेशी झोप मिळाल्यास रक्तदाब नियंत्रणात राहतो, हृदयाचे आरोग्य सुधारते आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो. झोप कमी झाल्यास कोलेस्टेरॉल वाढू शकतो आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.
वजन व्यवस्थापन: कमी झोप घेतल्याने चयापचयाच्या क्रियेमध्ये अडथळा येतो आणि लठ्ठपणा वाढतो. झोपेच्या कमतरतेमुळे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हाय कोलेस्टेरॉलचा धोका वाढतो.
रोगप्रतिकारशक्ती वाढवते: योग्य प्रमाणात झोप घेतल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुधारते आणि संसर्ग होण्याचा धोका कमी होतो. झोप कमी झाल्यास वारंवार सर्दी, ताप आणि अन्य आजार होण्याची शक्यता वाढते.
त्वचेचे आरोग्य सुधारते: चांगली झोप घेतल्यास त्वचा निरोगी राहते, डार्क सर्कल्स टाळता येतात आणि वृद्धत्वाची लक्षणे उशिरा दिसतात.
कमी झोप घेतल्याने काय होत ?
तणाव आणि मानसिक आजार: कमी झोप घेतल्याने नैराश्य, चिंता आणि चिडचिड वाढते, हृदयविकाराचा धोका: झोपेच्या अभावामुळे रक्तदाब वाढतो आणि हृदयविकाराचा धोका निर्माण होतो, लठ्ठपणा: कमी झोप घेतल्याने हंगर हार्मोन्समध्ये असंतुलन येते आणि जास्त भूक लागते, त्यामुळे वजन वाढते, डायबेटीस आणि उच्च रक्तदाब: झोपेच्या अभावामुळे इन्सुलिन रेसिस्टन्स वाढतो, ज्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो, स्मरणशक्ती आणि एकाग्रता कमी होणे: झोप कमी झाल्यास निर्णय क्षमता आणि मेंदूचे कार्यप्रदर्शन कमी होते
उत्तम झोपेसाठी महत्त्वाच्या टिप्स
रोज झोपण्याची आणि उठण्याची वेळ ठरवा,झोपण्यापूर्वी मोबाईल, टीव्ही, लॅपटॉपचा वापर टाळा. झोपण्यापूर्वी चहा, कॉफी किंवा अन्य उत्तेजक पदार्थ टाळा. नियमित व्यायाम केल्यास झोप चांगली लागते. झोपण्यापूर्वी ध्यान, योग किंवा शांत संगीत ऐका.