राज्यात पुन्हा एकदा 100 कोटींचा घोटाळा?

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2021 :-जालना साखर कारखान्यात कोट्यवधींचा गैरव्यवहार झाला असून या कारखान्याच्या रुपाली विश्वास पाटील असून त्यांचे पती विश्वास नांगरे-पाटील हे मुबंई पोलीस दलात सह पोलिस आयुक्त आहेत.

या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासह भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी नांगरे-पाटील यांना पोलिस दलातून मुक्त केले पाहिजे, अशी मागणी केली औरंगाबाद येथे मी अर्जुन खोतकर यांचा जालना सहकारी साखर कारखान्याचा घोटाळा बाहेर काढला. या कारखान्याचे मालक अर्जुन शुगर इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी आहे.

ही कंपनी अर्जुन खोतकर यांची आहे. खोतकर यांनी कारखान्याच्या खरेदीत 100 कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. खोतकर यांनी 2012 पासून जालना सहकारी साखर कारखाना खरेदी करण्यासाठी तापडीया आणि मुळे यांच्या कंपन्याचा आधार घेतला.

हा कारखाना खरेदी करण्यासाठी 42 कोटी 62 लाख 18 हजार रुपये अर्जुन खोतकर यांनी दिले असल्याचे तापडिया यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात दिले आहे. हे पैसे अर्जुन खोतकर यांच्याकडे कुठून आले, याचे उत्तर ठाकरे सरकारने द्यावे. त्यानंतर 42 कोटी 62 लाख 18 हजार रुपयांना खरेदी केलेला

कारखाना तापडीया यांच्या कंपनीने पुन्हा खोतकर यांच्या अर्जून शुगर इंडस्ट्रीजला 27 कोटीत विकल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. जे अजित पवारांनी जरंडेश्वर साखर कारखान्याच्या बाबतीत केलं, तेच अर्जुन खोतकरांनी जालना सहकारी साखर कारखान्यात केलं आहे असा आरोपही सोमय्या यांनी केला.

“अर्जुन शुगर प्रा ली या कारखान्याला आता दोन मालक आहेत. एक म्हणजे खोतकर परिवार आणि दुसरे अजित सीड्स प्रायव्हेट लिमीटेड. या अजित सीड्स प्रायव्हेट लिमिटेड मध्ये पद्माकर मुळे आणि परिवार तसेच रुपाली विश्वास नांगरे पाटील हे भागीदार आहेत. रुपाली पाटील यांचे पती विश्वास नांगरे पाटील हे मुंबईचे सह पोलीस आयुक्त आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाने या कारखान्याची चौकशी सुरु करण्याचा आदेश दिला. याबाबत चौकशी सुरु झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी चौकशी बंद करून क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर केला. पण आता या प्रकरणाची सीबीआय अथवा मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी झाली पाहिजे.

तोपर्यंत विश्वास नांगरे पाटील यांना पोलीस दलातून मुक्त करा, असेही सोमय्या म्हणाले. या कारखान्यात हजारो शेतक-यांची जमीन गेली आहे. त्याची किंमत आता 950 कोटी रुपये आहे. अर्जुन शुगर इंडस्ट्रीजच्या सर्व व्यवहारांची, कारखान्याशी जोडलेल्या सर्व व्यक्तींची चौकशी व्हायला हवी, या मागणीसाठी मी उद्या दिल्लीला जाणार आहे.

ईडी, कंपनी मंत्रालय, सहकार मंत्रालय या सर्वांची भेट घेणार आहे. आगामी विधानसभा अधिवेशनात या प्रकरणात ठाकरे सरकारने काय कारवाई केली, याचा हिशोब भारतीय जनता पार्टी मागणार असल्याचेही सोमय्या यांनी म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe