Maharashtra News : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता दहावी व बारावीच्या फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये होणाऱ्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे.
त्यानुसार इयत्ता बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्च या कालावधीत, तर दहावीची परीक्षा १ ते २२ मार्च या कालावधीत होणार आहे.
![Maharashtra News](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/08/ahmednagarlive24-Maharashtra-Newsd.jpg)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ परीक्षा घेतली जाईल.
परीक्षेचे दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहे. शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय व विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या हेतूने, तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने फेब्रुवारी-मार्च २०२४ च्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे.
• प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना कळवण्यात येईल. या वेळापत्रकाबाबत काही सूचना,
हरकती असल्यास त्या विभागीय मंडळाकडे तसेच राज्य मंडळाकडे १५ दिवसांच्या आत लेखी स्वरूपात पाठवाव्यात. त्यानंतर प्राप्त होणाऱ्या सूचनांवर विचार केला जाणार नाही, असे मंडळाकडून सांगण्यात आले.