Maharashtra News:राज्यातील पोलिसांची रिक्त असलेली १३ टक्के पदे तात्काळ भरण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. यासंबंधी नगर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी जनहित याचिका दाखल केली होती.
त्यावरील सुनावणीच्यावेळी हा आदेश देण्यात आला आहे. याचिकेवर पुढील सुनावणी ९ नोव्हेंबरला होणार आहे.रिक्त जागा भराव्यात, पोलिस ठाण्यांची संख्या वाढवावी, पोलिसांविरूद्धच्या तक्रारींसाठी सक्षम यंत्रणा उभारावी अशी मागण्या काळे यांनी याचिकेत केल्या आहेत.

त्यावर पुढील सुनावणी ९ नोव्हेंबरला होणार आहे. तोपर्यंत भरती करून प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे.यामध्ये राज्य सरकारने बाजू मांडताना सांगितले की, करोना काळात पोलिस भरती होऊ शकली नाही.
त्यामुळे मंजूर पदांच्या १३ टक्के जागा सध्या रिक्त आहेत. मात्र, त्या जागांवर भरती करण्याची प्रक्रिया सुरू आहे. न्यायालयाने यासह इतरही मुद्द्यांवर सरकाने सविस्तर अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे.