Maharashtra news : अयोध्येत राममंदिराच्या उभारणीसाठी भाजप आणि हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून देशाच्या कानाकोपऱ्यात फिरून राम मंदिरासाठी देणगी गोळा करण्यात आली होती.
काहीजणांनी रोख स्वरुपात पैसे दिले होते. तर अनेकांनी धनादेशाच्या माध्यमातून श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडे आपली वर्गणी जमा केली होती. मात्र, राम मंदिर ट्रस्टकडे आलेल्या धनादेशांपैकी सुमारे २००० चेक बाऊन्स झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या माध्यमातून जवळपास २२ कोटी रुपयांची देणगी देण्यात आली होती. मात्र, चेक बाऊन्स झाल्यामुळे ही रक्कम ट्र्स्टकडे जमाच झालेली नाहीविश्व हिंदू परिषदेच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
अयोध्येतील राम मंदिरासाठी आतापर्यंत जवळपास ३४०० कोटी रुपयांचा निधी जमा करण्यात आली आहे.. त्यामुळे आता चेक बाऊन्स झालेल्या देणगीदारांविरोधात काय भूमिका घेतली जाणार, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.