रेशनचे धान्य साठवण्यासाठी राज्यात ७५ गोदामे उभारण्यात येणार, गोदामांच्या बांधकामाला प्रशासकीय मान्यता

Published on -

पुणे- राज्यातील रेशन दुकानांना (रास्त भाव धान्य दुकाने) वितरित करण्यात येणारे धान्य साठवण्यासाठी नव्याने ७५ गोदामे उभारण्यात येणार आहेत. १.२८ लाख मेट्रिक टन इतके धान्य साठवण्यासाठी या गोदामांच्या बांधकामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमाची सद्यस्थिती दर्शवणारी माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्या माहितीनुसार, रेशन दुकानांमध्ये वितरित करण्यात येणारे धान्य साठवण्यासाठी राज्यात विविध ठिकाणी गोदामांची व्यवस्था केलेली आहे.

राज्यातील रेशन दुकानांना दरमहा वितरित करण्यात येणाऱ्या एकूण मासिक कोट्याच्या तीन पट म्हणजेच उर्वरित ३.२४ मेट्रिक टन साठवणूक क्षमता वाढवणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य सरकारने नवीन गोदामे उभारण्याचे नियोजन केलेले आहे. राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमात विभागस्तरावर धोरण ठरवण्याचे नियोजन करण्यात आले होते.

या धोरणानुसार रेशन धान्य साठवण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांकडून आवश्यक साठवणूक क्षमता वाढवण्यात येत आहे. हीच बाब लक्षात घेऊन १.२८ लक्ष मेट्रिक टन इतक्या क्षमतेचे धान्य साठवण्यासाठी नव्याने ७५ गोदामे उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी आवश्यक प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे. तसेच, उर्वरित १.९६ लक्ष मेट्रिक टन इतकी साठवणूक क्षमता वाढवण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत कार्यवाही केली जाणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe