7th Pay Commission : जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण केंद्र सरकारने अलीकडेच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली होती.
त्यानंतर अनेक राज्य सरकारांनी सरकारी कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देऊन महागाई भत्ता (DA) वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुन्या पेन्शन योजनेबाबत ग्रीन सिग्नल दिलेले आहेत. त्यांच्या निर्णयामुळे आझाद मैदानात आंदोलनासाठी बसलेल्या कर्मचाऱ्यांना यश मिळाले आहे.
दरम्यान, आता तामिळनाडूच्या एमके स्टॅलिन सरकारने बुधवारी मोठी घोषणा केली आहे. या घोषणेमध्ये तामिळनाडू सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 38 टक्क्यांवरून 42 टक्के केला आहे.
महागाई भत्त्यात वाढ करण्याचा हा निर्णय 1 एप्रिल 2023 पासून लागू मानला जाईल, असे सांगण्यात येत आहे. बुधवारी अधिकृत निवेदनात म्हटले आहे की या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर वार्षिक 2,366.82 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडेल. सरकारच्या या निर्णयामुळे 16 लाख सरकारी कर्मचारी, शिक्षक, पेन्शनधारक आणि कौटुंबिक पेन्शनधारकांना फायदा होणार आहे.
आणखी वाढ होण्याची शक्यता
यामध्ये डीए 38 टक्क्यांवरून 42 टक्के करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. केंद्र सरकार जेव्हा असे पाऊल उचलेल तेव्हा राज्य सरकारही त्यानुसार डीएमध्ये वाढ करेल, असे निवेदनात म्हटले आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (24 मार्च) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. महागाई भत्ता 38 टक्क्यांवरून 42 टक्के करण्यात आला आहे. महागाई भत्त्यात ही वाढ जानेवारी 2023 पासून लागू होणार आहे.