बिल मागितल्याचा राग आल्याने हॉटेल कर्मचाऱ्यावर चाकु हल्ला

Ahilyanagarlive24 office
Published:

Maharashtra News : जेवनाचे बिल मागितल्याचा राग येऊन तीन इसमांनी हॉटेल कर्मचाऱ्याच्या पोटात चाकू भोकसून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना कोपरगाव शहरालगत घडली. सदर चाकू हल्ल्यात २९ वर्षीय हॉटेल कर्मचारी अक्षय सुरेश शेलार हा

गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.

या प्रकरणी येथील शहर पोलीस ठाण्यात काल सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी शुभम साहेबराव आरगडे, अक्षय खंडेराव जगताप, रोहीत छगन साळवे (तिघे, रा. कोपरगाव) यांना येथील शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सदर आरोपीना न्यायालयात हजर करण्यात आले असून आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली असून शहरात गुन्हेगारीत वाढ होत असल्याने सामान्य नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.२५) रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास कोपरगाव शहरालगत असलेल्या हॉटेल अशोका या ठिकाणी आरोपी शुभम साहेबराव आरगडे, अक्षय खंडेराव जगताप, रोहीत छगन साळवे हे हॉटेल मध्ये जेवन करण्यासाठी गेले असता,

त्यांनी जेवन करून त्यांचे बिल न देता हॉटेल मधुन निघुन जात होते. तेव्हा हॉटेल कर्मचारी अक्षय शेलार याने त्यांना थांबवत त्यांना जेवनाचे बिल मागितले असता, त्याचा आरोपींना राग आला, त्यांनी अक्षय शेलार सांगितले की, तु आम्हाला ओळखतो का?

आम्ही आताच जेल मधून सुटून आलो आहे. आम्ही कोपरगावचे डॉन आहे, असे म्हणत आरोपीनी स्कुटीच्या डिकी मधुन चाकु काढुन अक्षय शेलार यांच्या पोटावर ऊजव्या बाजुने दोन वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याची फिर्याद अक्षय शेलार यांनी दिली आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रदिप देशमुख यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश येसेकर, पोलीस उपनिरीक्षक भरत दाते, संजय पवार, पोलीस कॉन्स्टेबल संभाजी शिंदे, राम खारतोडे, महेश तावरे, गणेश काकडे,

बाबासाहेब कोरेकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेत गुन्ह्यातील वरील तिन्ही आरोपींचा शोध घेऊन त्यांना रात्रीतून जेरबंद करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पो.नि. प्रदीप देशमुख यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप निरीक्षक भरत दाते हे करीत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe