मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी ५९ हजार कोटींचे पॅकेज जाहीर !

Maharashtra News : छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी शनिवारी येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ५९ हजार ५७९ कोटी ३४ लाख रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले. यामध्ये मराठवाड्यातील आठही दरम्यान,

यापूर्वी १४ ऑक्टोबर २०१६ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील बहुतांश निर्णय प्रलंबित असल्याच्या प्रश्नावर तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली.

ते म्हणाले, त्या बैठकीमध्ये एकूण ३१ निर्णय घेतले होते. त्यापैकी २०१७ पर्यंत आढावा घेऊन २३ निर्णय पूर्ण केले. उर्वरित ८ निर्णयांची अंमलबजावणी अडीच वर्षे सत्तेत राहिलेल्या सरकारने करणे अपेक्षित होते. मात्र, ते त्यांनी केले नसल्याचा आरोप त्यांनी केला. मराठवाड्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वॉटर ग्रीड योजनेला आम्ही मंजुरी दिली.

मात्र, त्याच सरकारने योजनेचा प्रस्ताव केंद्राकडे न पाठवल्यामुळे ही योजना मार्गी लागली नाही. आता आम्ही ही योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत आहोत त्यासाठी केंद्राकडून १५ ते २० हजार कोटींच्या निधीची अपेक्षा असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यांत आरोग्य, शिक्षण, कृषी, सिंचन, क्रीडा, पर्यटनासह विविध विभागांच्या योजनांचा समावेश आहे. विशेष म्हणजे मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या ९ हजार ४३७ कोटी ९० लाख रुपये खर्चाच्या कामांचादेखील समावेश असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह मंत्र्यांची उपस्थिती होती.

तब्बल सात वर्षांच्या खंडानंतर मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत बैठकीतील निर्णय जाहीर केले.