सात महिन्यांच्या गर्भवती महिलेला ऊस तोडावा लागतो, ही समाज व राजकारण्यांसाठी शरमेची बाब

Ahilyanagarlive24 office
Published:

Maharashtra News : राजकारण्यांतील संवेदनशिलता हरवत चालली असल्याचे आपण पाहतो. मात्र, काही जणांनी अद्यापही समाजाशी असलेली नाळ टिकवून ठेवली असून, संवेदनशिलता जपली आहे,

त्याचा प्रत्यय मंगळवारी (दि.२८) तालुक्यातील घोटण येथे केदारेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रतापकाका ढाकणे यांच्या माध्यमातून आला.

अवकाळी पावसामुळे ऊसतोडणी मजुरांचे हाल व उपासमार होत असल्याची माहिती समजताच ढाकणे यांनी ऊसतोडणी मजुरांच्या कोप्यांवर जाऊन त्यांना किराणा साहित्य व ऊबदार कपडयांचे वाटप केले.

रविवारपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे ऊसतोडणी मजुरांचे संसार उघड्यावर पडल्याची माहिती ढाकणे यांना समजताच त्यांनी तत्काळ आपल्या सहकाऱ्यांसह त्या ठिकाणी धाव घेत पाहणी केली व या मजुरांना किराणा साहित्य आणि ऊबदार कपडयांचे वाटप केले.

या वेळी बंडू बोरुडे, उद्धव दुसंग, अरुण घाडगे, रणजीत घुगे, कुंडलिक घुगे, जगदीश जगधने, सर्जेराव ढाकणे, दादासाहेब थोरवे, शहादेव घुगे उपस्थित होते.

श्रमिक वर्गाला प्रतिष्ठा मिळाली तरच खरी लोकशाही : ढाकणे

घोटण येथे ऊसतोड मजूर वास्तव्यास असलेल्या ठिकाणी चिखलाची दलदल होती, अक्षरशः या कामगारांची चूल पेटलेली नव्हती. एवढेच नव्हे तर लहान मुले व काही गर्भवती माता-भगिनी तेथे होत्या, सात महिन्यांची गर्भवती असलेली एक महिला ऊसतोडण्याचे काम करत होती. हे पाहून मला खूप वाईट वाटले.

मी थोडीफार मदत करण्याचा याठिकाणी प्रयत्न केला. सात महिन्यांच्या गर्भवती महिलेला ऊस तोडावा लागतो, ही समाज व राजकारण्यांसाठी शरमेची बाब आहे. श्रमिक वर्गाला प्रतिष्ठा आल्याशिवाय खऱ्या अर्थाने लोकशाही यशस्वी आहे,

असं मला तरी वाटत नाही, अशी प्रतिक्रिया या वेळी प्रतापकाका ढाकणे यांनी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe