Accenture Lay Off : जर तुम्ही IT क्षेत्रात काम करत असाल तर लक्ष द्या. कारण जगभरात मंदीचे संकट असताना आता IT क्षेत्रातील एक कंपनी 19000 कर्मचाऱ्यांना घरचा नारळ देणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ट्विटर, अॅमेझॉन आणि गुगलसारख्या बड्या कंपन्यांनंतर आता आयटी क्षेत्रातील बडी कंपनी एक्सेंचर या कंपन्यांना बाहेर काढण्याच्या तयारीत आहे.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/03/ahmednagarlive24-Accenture_1661863817.jpg)
कंपनीने दिलेल्या माहितीत 19 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्याची माहिती देण्यात आली आहे. याशिवाय कंपनीच्या निकालांमध्ये वार्षिक महसूल वाढ आणि नफ्याचा अंदाजही कमी करण्यात आला आहे.
दीड वर्षात 19 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात येणार
आयटी सेवा आणि सल्लागार कंपनी Accenture पुढील दीड वर्षात 19,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे. सध्या सुमारे 7 लाख लोक Accenture मध्ये काम करतात, त्यापैकी तीन लाख भारतात आहेत.
भारतातील कोणत्याही कंपनीतील कर्मचाऱ्यांची ही सर्वाधिक संख्या आहे. कंपनीने शेअर बाजाराला सांगितले की, चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत आमच्या धोरणात्मक वाढीला पाठिंबा देण्यासाठी आम्ही भरती सुरू ठेवली आहे.
खर्च कमी करण्यासाठी पावले उचलली
कंपनीकडून असेही सांगण्यात आले की आम्ही खर्च कमी करण्यासाठी आमच्या ऑपरेशन्स व्यवस्थित करण्यासाठी कारवाई सुरू केली आहे. पुढील 18 महिन्यांत या अंतर्गत सुमारे 19,000 लोकांना नोकरीवरून काढले जाऊ शकते. खर्च कमी करण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
या कंपन्यांनी कामही बंद केले
याआधी Amazon ने 18000, Microsoft 11000, Facebook ची मूळ कंपनी Meta 21000 आणि Twitter ने सुमारे 20000 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा करून सर्वांना चकित केले होते. एक्सेंचरच्या सीईओ ज्युली स्वीट यांनी सांगितले की, आम्ही 2024 आणि त्यानंतरच्या आर्थिक वर्षात खर्च कमी करण्याच्या दिशेने हे पाऊल उचलत आहोत.