अच्छे दिन कब आएंगे ? मोदींच्या सभेत महिलेचा प्रश्न

Published on -

अहमदनगर :- युतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींनी प्रचारसभा घेतली.

या सभेवेळी एका महिलेने झळकावलेल्या पोस्टर्सची सध्या सोशल मिडीयावर जोरदार चर्चा होत आहे.

‘शेतकऱ्यांना अच्छे दिन कधी येणार? शेतमालाला हमीभाव कधी मिळणार?’ असे प्रश्न विचारणारे पोस्टर्स या महिलेने झळकावले.

त्यामुळे पंतप्रधान मोदींची नगरमधील सभा चर्चेत आली आहे.

मोदींच्या या सभेत काळे कपडे घालून आलेल्या नागरिकांना प्रवेश देण्यात आला नाही.

सभेसाठी आलेल्या काही लोकांना काळ्या रंगाचं बनियान घातलं असल्यास ते उरवण्यास सांगितलं गेलं. याबाबत ‘आज तक’ने वृत्त दिलं आहे.

http://wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com/2019/04/12/pm-modi-in-nagar-black-no-entry-1256/
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe