अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कोरोना व्हायरसच्या भीतीने महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची चर्चा आहे.
शनिवारी सकाळी उघडकीस आलेल्या या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
नगर तालुक्यातील एक महिला काही दिवसांपासून आजारी होती. तिला सर्दी, खोकल्याचा त्रास सुरु होता.
त्या महिलेचा मृतदेह शनिवारी सकाळी आढळून आला. कोरोनो व्हायरसच्या भितीने त्या महिलेने आत्महत्या केली असावी, असा संशय आहे.
त्या महिलेने आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवलेली आहे. त्यात नेमका काय तपशील आहे, हे स्पष्ट होऊ शकले नाही.
मात्र कोरोनो व्हायरसच्या भितीने तिने आत्महत्या केली असावी, असा संशय आहे.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com