अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- सोसायटीचा ठराव घेऊ नये, यासाठी सोसायटीचे सचिवाचे अपहरण करून कोंडून ठेवण्यात आले होते. श्रीगोंदा तालुक्यात ही घटना घडली.
हे पण वाचा :- तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सत्तेतून बाहेर पडतील !
याप्रकरणी जिल्हा बँक संचालक दत्ता पानसरे, श्रीगोंदा उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे पण वाचा :- जिल्हा परिषेदतील राष्ट्रवादीच्या सहा सदस्याचे निलंबन
दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे, बाळासाहेब उर्फ प्रवीण कुमार बन्सीलाल नाहाटा, कल्याण बाबासाहेब शिंदे, धनंजय सुधाकर लाटे, विजय पाटोळे, महेश पानसरे, बाजीराव कळमकर, अमोल लाटे ही गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
हे पण वाचा :- अखेर अहमदनगर भाजप जिल्हाध्यक्षांची निवड झाली ! नावे वाचून तुम्हालाही धक्का बसेल …
राजेंद्र मधुकर खोल्लम (रा. पिंपळगाव पिसा, ता. श्रीगोंदा) हे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, पानसरे, नाहटा यांनी विविध कार्यकारी सोसायटी कोथूळ संचालक मंडळाची मीटिंग घेऊ नये म्हणून गैरकायद्याची मंडळी जमविली.
हे पण वाचा :- चार वर्षे झाली तो बेपत्ता आहे ! वयोवृध्द आई म्हणाली बाळा अजिंक्य! तू जिथं असशील….
संगनमताने खोल्लम यास प्रथम मोटारसायकल व त्यानंतर चारचाकी वाहनात जबरदस्ती बसविले. सोसायटीचा चार्ज का आणला, असे म्हणून उद्याचा ठराव झाला तर तुला गाडीखाली मारून टाकू, असा दम दिला.
हे पण वाचा :- सत्ता जाताच देवेंद्र फडणवीस यांना आली शनिची आठवण !
कृषी विद्यापीठ, पुणे येथे नेले. एका खोलीमध्ये डांबून ठेवले. ठराव झाला तर तुला संपवून टाकू, अशी धमकी दिली. याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात राजेंद्र खोल्लम यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे पण वाचा :- सुजित झावरेंचा हल्लाबोल : वसंतरावांचा विसर पडल्याने राहुल झावरे बेदखल झाले !