Ahmednagar Corona Breaking :- मोठ्या शहरांसह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना अहमदनगर जिल्ह्यासाठीही धाकधुक वाढविणारी माहिती पुढे आली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून एक अंकी असलेली नव्या कोरोना रुग्णांची संख्या आज दोन अंकी नोंदली गेली.

गेल्या २४ तासांत जिल्ह्यात नवे १५ रुग्ण आढळून आले आहेत. चाचण्यांमध्ये वाढ केल्याचा हा परिणाम असू शकतो, असा अंदाज आहे.
जिल्ह्यात आज १५ नव्या रुग्णांची नोंद. नगर शहरात सर्वाधिक पाच रुग्ण आढून आले आहेत.
याशिवाय कर्जत, पारनेर, नेवासा, शेवगाव तालुक्यातही रुग्ण आळून आले आहेत.
तर बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांनाही कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले.
राज्यात रुग्णवाढ होत असली तरी नगर जिल्ह्यात बराच काळ ही संख्या एक अंकीच होती.
मात्र, आता टास्क फोर्सने दिलेल्या सूचनांनुसार चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे.
जिल्हाधिकारा डॉ. राजेंद्र भोसले यांनीही बैठक घेऊन दररोज किमान सातशे चाचण्या करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
त्यानंतर आता दैनंदिन करोना रुग्णांची संख्या दोन अंकी झाल्याचे आढळून आले.