अहमदनगर :- लष्कराच्या सेवेत असलेल्या पतीच्या गुप्तांगावर केमिकलचा प्रयोग करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याची धक्कादायक घटना नगर तालुक्यातील रांजणी गावात ठरली आहे.
नगर तालुका पोलिसांनी सदर पतीच्या तक्रारीवरून सदोष मनुष्य वधाचा प्रयत्न म्हणून फिर्यादीची पत्नी आणि तिचा प्रियकर डमरे याच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे. या प्रकारामुळे नगर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर असे कि, फिर्यादी हे लष्करात आहेत. ते सुट्टीवर घरी आले होते. त्यावेळी फिर्यादीच्या पत्नीने तिचा साथीदार सतीश डमरे याच्या मदतीने फिर्यादीविरोधात त्याला मारण्यासाठी हे कटकारस्थान रचले.
शरीरसंबंधापूर्वी फिर्यादी पतीने गुप्तांगाला केमिकल क्रिम लावली. ही क्रिम पत्नीने आणून दिली होती. या केमिकल क्रिममुळे फिर्यादी पतीच्या गुप्तांगाला काही दिवसांनी इजा झाली.
फिर्यादी पतीने याप्रकरणावरून आपल्या मारण्याचा प्रयत्न होत असल्याची तक्रार नगर तालुका पोलिसांकडे केली आहे. नगर तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राजेंद्र पवार यांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे.