Maharashtra News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोलापूर आणि अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पुण्याच्या पालकमंत्रीपदावरून भाजप आणि अजित पवार गटात सुरू असलेली रस्सीखेच सुरु होती.

आता अजित पवार यांच्याकडे पुण्याचं पालकमंत्रीपद दिल आहे. ऐन महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पवार यांच्याकडे पालकमंत्रीपद आल्याने राष्ट्रवादीचं पुण्यातील बळ वाढेल.
चौकट
११ जिल्ह्यांचे सुधारित पालकमंत्री
पुणे- अजित पवार
अकोला- राधाकृष्ण विखे
सोलापूर- चंद्रकांत पाटील
अमरावती- चंद्रकांत पाटील
भंडारा- विजयकुमार गावित
बुलढाणा- दिलीप वळसे
कोल्हापूर- हसन मुश्रीफ
गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम
बीड- धनंजय मुंडे
परभणी- संजय बनसोडे
नंदूरबार- अनिल भा. पाटील