राज्यासाठी धोक्याची घंटा ! राज्यात आणखी आठ ‘ओमायक्रॉन’बाधित आढळले

Updated on -

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- राज्यात आता हळूहळू ओमायक्रॉनबाधित रूग्ण आढळून येताना दिसत आहेत. आज राज्यात आठ नवीन ओमायक्रॉनबाधित रूग्ण आढळून आले आहेत.(Omicron News) 

राज्यात आज आढळलेल्या आठ ओमायक्रॉनबाधितांमध्ये मुंबईत सात जण तर वसई-विरारमधील एका रूग्णाचा समावेश आहे. तर, आजपर्यंत राज्यभरात २८ ओमायक्रॉन बाधित आढळून आले आहेत.

दरम्यान एक दिलासादायक बाब म्हणजे या २८ बाधितांपैकी ९ रूग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रूग्णालयामधून सुट्टी देखील मिळालेली आहे.

याचबरोबर महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये ६८४ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत, तर ६८६ रूग्ण कोरनामुक्त झाले आहेत. याशिवाय २४ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe