Amrita Fadnavis : अमृता फडणवीस आता उर्फी जावेदचे मार्केट जाम करणार!! फोटो बघून अमृता फडणवीस ट्रोल

Ahmednagarlive24 office
Published:

Amrita Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सतत चर्चेत असतात. त्यांची गाणी तसेच त्यांनी केलेली वेगवेगळी वक्तव्य यामुळे त्या चर्चेत असतात. तसेच त्या सोशल मीडियावर खूप सक्रीय आहेत. त्या विविध प्रकारच्या कार्यक्रमांना हजेरी लावतात.

असे असताना अलीकडेच त्यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कायक्रमातील काही फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यावर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त करून त्यांना ट्रोल केले आहे.

त्यांनी या कार्यक्रमात डिझायनर ड्रेस परिधान केला होता. काही दिवसांपूर्वी कुर्त्यावरून ट्रोल झालेल्या अमृता फडणवीस आता या ड्रेसमुळे ट्रोल होत आहेत. यावर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. आपण देवेंद्र फडणवीस साहेबांना शोभत नाहीत, असेही काहींनी म्हटले आहे.

तसेच अमृता फडणवीस आता उर्फी जावेदचं मार्केट जाम करणार’, अशा कमेंट्स नेटकरी करत आहेत. यामुळे आता याचे फोटो देखील व्हायरल केले जात आहेत. काहींनी त्यांची तुलना उर्फी जावेदशी केली आहे.

यामुळे आता त्या यावर काही प्रतिक्रिया देणार का हे लकरच समजेल. असे असले तरी काहींनी त्यांच्या ड्रेसवरून त्यांचे कौतुक केले आहे. अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे आले तरी त्यावर अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जातात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe