संगमनेर -लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील सभासद शेतकरी व सर्व सामान्य नागरिकांची आर्थिक कामधेनु असलेल्या अमृतवाहिनी बँकेने सातत्याने सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे .सौ कांचनताई थोरात यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बँकेच्या वतीने तालुक्यातील 10 शाळांना संगणक संच देण्यात आले आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या वतीने सामाजिक कार्यकर्त्या सौ. कांचनताई थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त 10 संगणक संच देण्यात आले यावेळी बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी, व्हाईस चेअरमन ॲड नानासाहेब शिंदे, संचालक किसनराव सुपेकर, संजय थोरात ,अविनाश सोनवणे, शांताराम फड,ॲड लक्ष्मण खेमनर, अण्णासाहेब शिंदे, श्रीमती ललिता दिघे, माजी संचालक नागरे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अंबादास वाणी आदी उपस्थित होते.

यावेळी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळवाडे,जयहिंद आदिवासी आश्रम शाळा कोळवाडे, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात विद्यालय कनोली, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात विद्यालय शेडगाव, जयहिंद वाचनालय वाघापूर, डॉ.अण्णासाहेब शिंदे विद्यालय देवगाव ,जिल्हा परिषद शाळा ओझर बु, बी ए शिंदे बिरोबा विद्यालय रहिमपूर ,जिल्हा परिषद शाळा जोर्वे, काशेश्वर विद्यालय कासारा दुमाला यांचा समावेश आहे.
यावेळी बोलताना सौ कांचनताई थोरात म्हणाल्या की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सभासद शेतकरी गोरगरीब माणसाच्या मदतीकरता अमृतवाहिनी बँक स्थापन केली. बँकेने चांगल्या कामातून राज्यपातळीवर आपला लौकिक निर्माण केला आहे. अनेक बक्षीस मिळवलेली आहे.सभासद व ठेवीदारांचे हित जपताना बँकेने सातत्याने अ दर्जा राखला आहे. याचबरोबर पर्यावरण, शिक्षण, कृषी अशा विविध क्षेत्रातील प्रगतीसाठी सातत्याने योगदान दिले असल्याचे ते म्हणाले.
तर सुधाकर जोशी म्हणाले की माजी शिक्षण मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवले आहेत. या शाळांमधून इंग्रजी आणि गणिताचे दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी विशेष उपक्रम आखण्यात आले असून जिल्हा परिषदसह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान मिळावे याकरता बँकेच्या माध्यमातून दहा शाळांना संगणक संच देण्यात आले आहेत.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी अंबादास वाणी यांनी केले तर व्हाईस चेअरमन नानासाहेब शिंदे यांनी आभार मानले. याप्रसंगी शाळांचे मुख्याध्यापक,अमृतवाहिनी बँकेचे विविध अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.