Pune News : शनिवारपासून पुण्यातील ‘हा’ एक महत्त्वाचा उड्डाणपूल वाहतुकीसाठी होणार बंद! अशा पद्धतीने केला जाईल वाहतुकीत बदल

Published on -

Pune News :- पुणे हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक राजधानी असून औद्योगिक विकासाच्या दृष्टिकोनातून पुणे शहराचा विकास खूप झपाट्याने झालेला आहे. त्यामुळे पायाभूत सुविधा उभारण्याच्या दृष्टिकोनातून अनेक महत्त्वाचे प्रकल्पांची कामे पुण्यामध्ये सुरू आहे.

तसेच अगोदरच अस्तित्वात असलेले बरेच उड्डाणपूल देखील पुण्यामध्ये आहेत. परंतु पुण्यामध्ये असलेल्या काही उड्डाणपुलाचा विचार केला तर ते सध्या धोकादायक स्थितीत आहे व त्यातीलच एक उड्डाणपूल म्हणजे साधू वासवाणी उड्डाणपूल होय. याच उड्डाणपुलाविषयी एक महत्त्वाचे अपडेट सध्या समोर आली असून ती पुणेकरांसाठी खूप महत्त्वाची आहे.

पुण्यातील साधू वासवानी उड्डाणपूल शनिवारपासून वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पुण्यातील साधू वासवानी उड्डाणपूल धोकादायक झाल्यामुळे हा पुल शनिवारपासून वाहतुकीकरिता पूर्णपणे बंद केला जाणार असून या भागातील वाहनांसाठी पर्यायी रस्ते वाहतुकीसाठी आता उपलब्ध केले जाणार आहेत.

हा पूल आता पाडण्यात येणार असून त्या ठिकाणी नव्याने उड्डाणपूल बांधला जाणार आहे. साधारणपणे पन्नास वर्षांपूर्वी या उड्डाणपुलाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेले होते.

सध्या स्थितीत या उड्डाणपुलाचे आयुर्मान संपत आल्यामुळे तो वाहतुकीकरिता आता धोकादायक स्थितीत असल्याने महापालिकेने या उड्डाणपुलावरील अवजड वाहतूक आधीच बंद केलेली होती. वर्षभर अनेक पद्धतीने डागडुजी करण्याचा प्रयत्न करण्यात आला

परंतु तरीदेखील हा उड्डाणपूल कमकुवत स्थितीतच राहत असल्याने त्याचे स्लॅब चे सिमेंट पडून अपघात होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्यामुळेच आता हा उड्डाणपूल वाहतुकीकरिता बंद केला जाणार असून सहा जानेवारीपासून प्रायोगिक तत्त्वावर पुढील दहा ते पंधरा दिवस वाहतुकीची पर्यायी व्यवस्था करण्यात येणार आहे.

या ठिकाणच्या वाहतुकीत केला जाईल बदल

हा उड्डाणपूल बंद झाल्यामुळे आता नगर रस्ता, कोरेगाव पार्क, बंडगार्डन, विधान भवन, मोरवाडा या परिसरातील वाहतुकीत बदल केला जाणार आहे. काही रस्त्यांवर एकेरी वाहतूक सुरू केली जाणार आहे व त्यासंबंधीचे नियोजन वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe