आरोग्य विभागाच्या प्रश्नपत्रिका फोडण्यात सहभागी असलेल्या आणखी एकास अटक

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :- राज्यात सध्या पेपर फुटी प्रकरण तसेच परीक्षांचे घोटाळे बाहेर येत असतानाच एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

आरोग्य विभागाच्या गट ‘क’ पेपरफुटी प्रकरणात, पुण्याच्या सायबर विभागाच्या पथकाने बीडमधून एका जिल्हा परिषद शिक्षकाला अटक केली आहे.

नागरगोजे असे या शिक्षकाचे नाव असून गेल्या 15 दिवसांपासून पुण्याचे पथक बीडमध्ये शिक्षक नागरगोजेचा शोध घेत होते. आरोग्य विभागाच्या गट क पेपरफुटी प्रकरणात बिडमधून नागरगोजे नामक शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.

गेल्या 15 दिवसांपासून त्याचा शोध सुरू होता. दरम्यान आरोग्य विभागाच्या प्रश्नपत्रिका फोडण्यात त्याचाही सहभाग असल्याचं निष्पन्न झालं आहे.

आरोग्य विभागाच्या पेपरफुटी,तसेच म्हाडा आणि त्यानंतर टीईटी पेपरफुटी प्रकरणात आत्ता पर्यंत पुणे पोलिसांच्यावतीने 35 जणांना अटक करण्यात आली आहे.

या सर्वांचा पेपरफुटी प्रकरणात संबंध असल्याचं निष्पन्न झालं आहे. या अगोदर पेपटफुटी प्रकरणात बीडच्या शिरूर तालुक्यातील, तितरवणी येथील शिक्षक उद्धव प्रल्हाद नागरगोजे याला अटक करण्यात आलेली होती.

याच उद्धव नागरगोजेचा आणि या गळाला लागलेल्या जिल्हा परिषद शिक्षक नागरगोजेचा जवळून संबंध असल्याचं बोललं जातंय. जिल्हा परिषद शिक्षक नागरगोजेचा संबंध अनेक भरती प्रकरणाशी असल्याची चर्चा आहे.

तर अटकेत असलेला संगमनेरचा आरोपी सुखदेव डेरे आणि शिक्षक नागरगोजे एकमेकांचे खास होते, असेही सांगितले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe