Maharashtra news:मोहंमद पैगंबर यांच्यासंबंधी वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल गेल्या महिन्यात भाजपने नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांची पक्षातून हकालपट्टी केली होती.
आता पक्षाने हरियाणा आयटी सेलचे प्रभारी अरुण यादव यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. इस्लामविरोधी टि्वट केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.मुख्य म्हणजे यादव यांचे हे ट्विट ताजे नाही २०१७ मध्ये यादव यांनी हे टि्वट केले होते.
मात्र, सध्याच्या परिस्थितीत ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याला जोडून ‘अरुण यादव यांना अटक करा,’ असा ट्रेंडही सुरू आहे. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष ओपी धनख़ड यांनी ही कारवाई केली. मात्र, याबाबत त्यांनी कोणतेही कारण दिलेले नाही किंवा यादव यांच्याबाबत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.