मराठा आरक्षण : अंतरवली सराटी ते मुंबई पदयात्रा नगरमध्ये मुक्कामी

Published on -

अहमदनगर : मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवली सराटी ते मुंबई पदयात्रा अहमदनगर येथून जाणार असून, यामध्ये लाखोच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या मुक्कामासाठी बाराबाभळी मदरसाची जरांगे पाटील यांच्या नियोजन कमिटीने पाहणी केली.

यावेळी मदरसाचे सेक्रेटरी मतीन सय्यद समवेत श्रीराम कुरणकर, राम जरांगे, गोरख दळवी, मिलिंद जपे, भाग्येश सवासे, विलास तळेकर, स्वप्निल दगडे, सुधीर दुसंगे, संदीप जगताप, परमेश्वर पाटील आदी उपस्थित होते.

बाराबाभळी मदरसाची ८५ एकर जागेची व मदरसाची पाहणी करण्यात आली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंतरवली सराटी येथून २० जानेवारीला पदयात्रेने मुंबईला जाण्यासाठी सुरुवात होणार आहे.

या पदयात्रेत लाखोच्या संख्येने मराठा बांधव सहभागी होणार असून, ही पदयात्रा अंतरवली सराटी ते गेवराई, खरवंडी, पाथर्डी, तिसगाव, अहमदनगर, केडगाव, सुपा, शिरूर, वाघोली, शिवाजीनगर, पुणे, मुंबई एक्सप्रेस हायवे, लोणावळा, पनवेल, मुंबई अशा मार्गाने जाणार आहे.

मराठा मोर्चा नगर शहरात येत असताना बाराबाभळी येथील मदरसामध्ये मुक्काम असणार असून येथे अन्न, पाणी, लाईट, निवास या सोई सुविधा नियोज कमिटीने पाहणी केली व येथेच मुकामी थांबण्याचे आश्वासन दिले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News