सभापती निवडणुकीसाठी 21 पासून अर्ज भरता येणार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :-   अहमदनगर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी येत्या 25 सप्टेंबरला निवडणूक होणार आहे. या संबंधी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आदेश दिले झोटे.

दरम्यान आज मनपाच्या स्थायी समिती सभापती पदासाठी निवडणूक कार्यक्रम पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जाहीर केला आहे.

21 सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. सदर निवडणूकीची प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयातून ऑनलाईनद्वारे पार पडणार आहे.

एकापेक्षा जास्त उमेदवार शिल्लक राहिल्यास मतदान प्रक्रियाही ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. तसेच अर्ज माघारीची प्रक्रियाही ऑनलाईनच होणार असल्याचे नगर सचिव एस. बी. तडवी यांनी सांगितले.

जाणून घ्या कसा असणार निवडणूक कार्यक्रम:

  • उमेदवारी अर्ज वितरण व दाखल करणे : 21 ते 24 सप्टेंबर 2020
  • वेळ : सकाळी 11 ते 1.30 वाजेपर्यंत
  • स्थळ : नगरसचिव कार्यालय
  • 25 सप्टेंबर रोजी निवडणूक विशेष सभा
  • सकाळी 11 वाजता : सभा सुरु झाल्यानंतर प्राप्त पीठासीन अधिकारी यांच्याकडे सादर होणार
  • सकाळी 11.10 वाजता : उमेदवारी अर्जांची छाननी
  • छाननीनंतर अर्ज माघारीसाठी 15 मिनिटे मुदत
  • छाननीनंतर वैध उमेदवारांची नावे जाहीर करणे
  • एकापेक्षा जास्त उमेदवार शिल्लक राहिल्यास ऑनलाईन मतदान प्रक्रिया पार पाडणे

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment