Maharashtra News : आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठीच्या ५१३ कोटी निधी वितरणास मान्यता

Published on -

Maharashtra News : राज्यात मार्च, एप्रिल आणि मे २०२३ मधील नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांच्या व मालमत्तेच्या झालेल्या नुकसानीकरिता द्यायच्या मदतीसाठी एकूण ५१३.७९ कोटी

रुपयांचा निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

भाजपचे सदस्य प्रवीण दटके यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी मंत्री पाटील म्हणाले, राज्यात मार्च ते मे २०२३ या कालावधीमध्ये झालेला अवेळी पाऊस व गारपीट यामुळे एकूण तीन लाख दोन हजार ७०६ हेक्टर शेती पिकांचे नुकसान झाले आहे.

तसेच या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे ९५ व्यक्तींचा, तर ९४६ जनावरांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे. याव्यतिरिक्त आणखी नुकसान झाल्याचे निदर्शनास आल्यास तपासून त्याबाबत निर्णय घेण्यात येईल. दरम्यान, या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य एकनाथ खडसे, जयंत पाटील, सुरेश धस यांनी सहभाग घेतला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News