१५ फेब्रुवारी २०२५ पुणे : राज्य सरकारने घेतलेल्या मुलींच्या फी माफीसाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील अॅक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी शुक्रवारी पुण्यातील गरवारे महाविद्यालयास अचानक भेट देऊन मुलींच्या फी माफी निर्णयाच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला.
तसेच राज्यातील १०० महाविद्यालयांना अचानक भेट देणार असल्याचे नमूद केले.उच्च शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढावे,यासाठी राज्य सरकारने व्यावसायिक आणि वैद्यकीय शिक्षणाचे शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला होता.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/9-2.jpg)
त्यासाठी एकूण ८४२ कोर्सेससाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात दोन हजार कोटींची तरतूद देखील केली होती.या निर्णयाच्या अंमलबजावणीतील शैक्षणिक संस्थांसमोरील अडचणी दूर करण्यासाठी शासनाने दिशानिर्देश देखील जारी केले होते.तसेच उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून भरारी पथक नेमून विद्यार्थिनींच्या तक्रारींची दखल घेतली जात होती.