Pune News : दारू पिताना तीन मित्रांमध्ये वाद ! मित्राच्या गुप्तांगावर ब्लेडने वार करून खून

Ahilyanagarlive24 office
Published:

Pune News : चिंचवड रेल्वे स्थानकाजवळील विहिरीत शनिवारी (दि. १२) कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला होता. दारू पिताना तीन मित्रांमध्ये वाद झाला.

यात दोन जणांनी मित्राच्या गुप्तांगावर ब्लेडने वार करून हा खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यातही आरोपींनी खून केल्यानंतर घरफोडीचा प्रयत्न केला. त्यावेळी रंगेहाथ पकडले.

गणेश उर्फ दाद्या भगवान रोकडे ( वय १८) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी गणेश रोकडे याची आई सुनीता भगवान रोकडे (वय ४०, रा. बौद्धनगर, पिंपरी) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यानुसार अभिषेक उर्फ डल्या गायकवाड (रा. चिंचवड) याच्यासह एका विधीसंघर्षित मुलाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विधीसंघर्षित मुलगा, डल्या गायकवाड व गणेश रोकडे हे तिघेही मित्र होते. ते तिघेही बुधवारी (दि. ९) रात्री उशिरा चिंचवड रेल्वे स्थानकाजवळ लोहमार्गालगत दारू पित होते.

त्यावेळी मध्यरात्रीनंतर त्यांच्यात वाद झाला. यात विधी संघर्षित मुलगा व डल्या गायकवाड यांनी गणेश रोकडे याच्यावर ब्लेडने व सुऱ्याने वार केले. यात गणेश रोकडे याच्या गुप्तांगावर देखील ब्लेडने वार केले.

त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या गणेश रोकडे याचा मृत्यू झाला. दरम्यान, चिंचवड रेल्वे स्थानकाजवळील विहिरीत एक मृतदेह असल्याची माहिती चिंचवड पोलिसांना शनिवारी (दि. १२) मिळाली.

गणेश रोकडे याचा मृतदेह विहिरीत टाकून दिल्यानंतर विधीसंघर्षित मुलगा व इल्या गायकवाड या दोघांनी चिंचवड येथे चोरी करण्यासाठी घरफोडीचा प्रयत्न केला. मात्र, काही नागरिकांनी त्यांना रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe