Maharashtra News : महाराष्ट्रातील तब्बल ७३८ गावांना पुराचा, दरडींचा धोका !

Ahilyanagarlive24 office
Published:

Maharashtra News :  रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीमधील दुर्घटना घडल्यानंतर राज्यात सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांवर विरोधकांनी शरसंधान साधले आहे. जीएस आय आणि जीएसडीए सारख्या संस्थांनी दोन ते तीन वषांपासून धोकादायक गावांचा अहवाल सादर केला असताना अद्याप याबाबत जिल्हा प्रशासकीय पातळीवर कुठलीच कार्यबाही झाली नसल्याने मंत्री, ‘लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय पातळीवर वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत.

पश्‍चिम महाराष्ट्रातील १४४ गावे घोकादायक दरड प्रवण असून तब्बल ५९४ पूर प्रवण क्षेत्र असल्याचे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा (जोएसडीए) आणि भारतीय भूवैज्ञानि सर्वेक्षण (जीएसआय) यांच्या तपासात समोर आले आहे, पश्‍चिम महाराष्ट्रातील अशा तब्बल ७३८ गावांना पुराचा, दरडींचा धोका निर्माण झाला आहे, यामध्ये सर्वांधिक दरडप्रवण ७६ गावे कोल्हापूर जिल्ह्यात असून सोलापूर जिल्ह्यात एकही दरड प्रवण गाव नाही.

पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये सर्वांधिक ११ तालुक्यांत ७६ दरड प्रवण गावे तर त्यापाठोपाठ सातारा जिल्ह्यातील ४१ गावे, पुणे २३, सांगली ४, तर सोलापूर जिल्ह्यात एकही गाव दरड प्रवण नाही. दरड प्रवण गावांमधील नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात जीव मुठीत घरून राहावे लागत असल्याने यातील केवळ ११ गावांकडून पुनर्वसन करण्याबाबत प्रस्ताव पाठवले आहेत.

नद्यांचे प्रवाह बदलल्याने गावांना पुराचा धोका

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पूरप्रवण क्षेत्रातही जीएसडीएकडून सर्वेक्षण करण्यात आले असता कृष्णा, वारणा, इंद्रायणी, कोयना, नीरा आदी प्रमुख नद्यांसह उजनीच्या क्षेत्रातील अनेक परिसर, छोट्या-मोठ्या नद्यांवरील तब्बल ५९४ गावे पूरप्रण आहेत. अनेक ठिकाणांवर नदी पात्रालगत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण, नदीचा प्रवाह अडवणे, बांधकाम, विकासकामे केल्याने नैसर्गिक खोतांना धोका निर्माण झाला असल्याचे सर्वेक्षणात समोर आले आहे. त्यामुळे नद्याचे प्रवाह बदलून नदीजवळ असणाऱ्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe