Pune News : पुणे जिल्ह्यात आढळला तब्बल १५ फूट अजगर

Published on -

Pune News : मावळमधील बोरज गावच्या हद्दीतील वनक्षेत्रात सुमारे १५ फूट अजगर आढळल्याने मोठी खळबळ उडाली. पाण्याच्या प्रवाहात आराम करत बसलेल्या या अजगरला पाहायला अनेक तरुणांनी गर्दी केली. पण, अजगराच्या जिवास धोका पोहचू नये त्यासाठी त्याला पुन्हा त्याठिकाणाहून पकडून घनदाट जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले आहे.

बोरज गावाशेजारील एका गोठ्यापासून काही अंतरावर असलेल्या भागात अजगर असल्याची माहिती रोहन तिकोणे या तरुणाने शिवदुर्ग टीमला दिली. शिवदुर्ग व वन्यजीवरक्षक टीमचे अनिल आंद्रे, दक्ष काटकर, जिगर सोलंकी, मोरेश्वर मांडेकर, किरण तिकोणे, यश वाडेकर, तेजस केदारी, बबलू मुऱ्हे यांनी जाऊन पाहणी केली असता, अजगर हा त्याच्याच अधिवासात एका पाण्याच्या प्रवाहात विश्रांती घेत होता.

काहीतरी खाल्ल्याने त्याला हालचालही करता येत नव्हती. पण त्याठिकाणी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने अजगर त्याठिकाणी असणे हे असुरक्षित वाटू लागल्याने त्याबद्दल वनविभागास माहिती देऊन त्यास पकडून मिळालेल्या ठिकाणाहून दूर घनदाट जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडून देण्यात आले आहे. यासाठी वन्यजीवरक्षक टीमचे अनिल आंद्रे, दक्ष काटकर, जिगर सोलंकी, मोरेश्वर मांडेकर, किरण तिकोणे, यश वाडेकर यांचे सहकार्य लाभले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe