अहमदनगर Live24 टीम, 04 एप्रिल 2022 Maharashtra news : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणानंतर राज्यात मशिदींवरील भोंग्यांवरुन वाद सुरू आहे. या पार्श्वभूमीव गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची एक कृती लक्षवेधक ठरली आहे.
शिरूर तालुक्यातल मलठण या गावात वळसे पाटील यांच्या उपस्थित एक कार्यक्रम सुरू होता. त्यामध्ये त्यांचे भाषण सुरू असतानाच मशिदीवरील भोंग्यावरून आजान सुरु झाली.
त्यावेळी वळसेपाटील यांनी आपले भाषण थांबविले. यासंबंधी बोलताना ते म्हणाले, ‘प्रत्येक धर्माचा आदर करणे ही आपली पद्धत आहे.
मात्र, सध्या देशात विकासावर बोलायचे सोडून आजान आणि हनुमान चालिसा असा वाद लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे प्रकार देशासाठी धोकादायक आहेत,’ असेही वळसे पाटील म्हणाले.