Maharashtra News : सध्या महाराष्ट्रात ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरण चांगलेच गाजत आहे. राजकीय आरोप प्रत्यारोप चांगलेच रंगले आहेत. आता त्याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान त्याच्या अटकेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा इशारा विरोधकांना दिला आहे.
ते म्हणालेत की, आता चौकशी होईल. त्यातून मोठ सत्य समोर येईल. जे चौकशीतून बाहेर येईल त्यातून बोलणाऱ्यांची तोंड बंद होतील असा इशाराच फडणवीसांनी दिला आहे. फडणवीस हे आज पुण्यात होते. त्यावेळी त्यांना पाटील बाबत विचारणा केली. यावर बोलताना
ते म्हणाले, ‘व्यसनमुक्त महाराष्ट्राची संकल्पना घेऊन आम्ही परिषदेचे आयोजन केले होते. दरम्यान, याची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनीही नाशिकवर छापा टाकला. इतर ठिकाणीही छापे टाकण्यात आले. ललित पाटील त्यांच्या हातात आले आहेत,
त्यामुळे मोठे जाळेही समोर येणार आहे. त्याबद्दल मला काही गोष्टी आता कळल्या आहेत. पण मी योग्य वेळी यावर बोलणार आहे. पण यातून आपल्याला मोठा नेक्सस मिळणार आहे. जेव्हा ते बाहेर येईल, तेव्हा बरेच लोकांची तोंड बंद होतील.
दरम्यान पाटील याने मी पळालो नाही तर मला पळून जाण्यास भाग पाडले असा आरोप देखील केलाय. यावर देखील फडणवीस बोलले आहेत. ते म्हणाले की, ललित पाटील काय बोलतो याकडे लक्ष देण्यापेक्षा पोलिसांच्या तपासातून काय निष्पन्न होते याकडे लक्ष द्यायला हवे.
पोलिसांच्या तपासात जेव्हा माहिती समोर येईल तेव्हा सर्वांची तोंड गप्प होतील. पोलीस सर्व गोष्टींचा तपास करत आहेत. दोषींना सोडले जाणार नाही. सर्वांवर कारवाई केली जाईल असेही फडणवीस म्हणाले.