Asaduddin Owaisi : समान नागरी, लव्ह जिहाद कायद्यासह हिंदू राष्ट्राला MIM चा विरोध, अधिवेशनात मांडले ठराव

Published on -

Asaduddin Owaisi : एमआयएमचे सर्वेसर्वा असदोद्दीन ओवेसी खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रमुख उपस्थितीत दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाचा मुंबईत समारोप झाला. देशभरातील आमदार, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हे अधिवेशन पार पडले. यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी काही ठराव करण्यात आले आहेत.

यामध्ये प्रामुख्याने हिंदू राष्ट्रासह समान नागरी कायदा, लव्ह जिहाद कायद्याला विरोधाचा ठराव घेण्यात आला. तसेच मुस्लिम आणि दलितांवर होणारे अत्याचार, हिंसाचाराचा निषेध, मुस्लिमांना आरक्षण देण्याची मागणी करणारा ठराव, समान नागरी कायद्याला विरोध करणारा ठराव, लव्ह जिहाद कायद्याला विरोध करणारा ठराव मांडला.

तसेच वक्फ मालमत्तेचे संरक्षण आणि अतिक्रमण करणार्‍यांना बेदखल करण्याचे अधिकार प्रदान करण्यासाठी वक्फ कायद्यात सुधारणा करण्याची मागणी करणारा ठराव मांडला. मौलाना आझाद नॅशनल फेलोशिप बंद करण्याचा आणि अल्पसंख्याक अनुसूचित जाती-जमातींच्या शिष्यवृत्तीवर निर्बंध घालण्याचा निषेध करणारा ठरावही यावेळी मांडला.

यामुळे हे अधिवेशन अनेक कारणाने चर्चेत आले. एमआयएम पक्ष राष्ट्रीय विस्तारासाठी आणि शोषितांच्या एकतेसाठी वचनबद्ध असल्याचा ठराव मांडण्यात आला. तसेच चिनी घुसखोरीचा निषेधही यावेळी करण्यात आला.

तसेच या अधिवेशनात नागरी स्वातंत्र्याचे संरक्षण, सर्व राजकीय कैद्यांच्या सुटका आदी ठराव अधिवेशनात मांडण्यात आले. या ठरावामुळे सध्या हिंदू मुस्लिम समाजात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News