Asani Cyclone : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या वादळाचे रूपांतर आता चक्रीवादळात (Hurricane) होऊन त्याचा परिणाम काही राज्यांमध्ये दिसू लागला आहे. तसेच त्याचा त्याचा धोका अधिक तीव्र होत असल्याचे हवामान खात्याकडून (Weather department) सांगण्यात येत आहे.
अनेक राज्यांमध्ये कडाक्याच्या उष्णतेमध्ये आसनी चक्रीवादळाचा धोका वाढला आहे. सध्या ‘आसानी’ वादळ पूर्व किनारपट्टीकडे सरकत असल्याने मुसळधार पावसासह प्रभावित भागात ताशी १२० किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत.

हवामान विभागाच्या (IMD) मते, ‘आसानी’ चक्रीवादळ आज उत्तर आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर पोहोचल्यावर त्याचे चक्री वादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे.
यापूर्वी, एमआयडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी रविवारी सांगितले होते की चक्रीवादळ ओडिशा किंवा आंध्र प्रदेशात धडकणार नाही. त्याऐवजी ते पूर्व किनाऱ्याला समांतर सरकून पाऊस पाडेल.
आसानी चक्रीवादळाचा (Asani Hurricane) प्रभाव पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, नागालँड, मिझोराम, ईशान्येकडील राज्यांमध्ये दिसून येईल. आसनी चक्रीवादळाचा प्रभाव झारखंड आणि बिहारमध्येही दिसून येईल.
चक्रीवादळामुळे ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये सोमवारपासून मुसळधार पाऊस पडत आहे. आज संध्याकाळपासून कोस्टल ओडिशा, उत्तर आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या लगतच्या भागात पावसाची शक्यता आहे.
याबाबत ओडिशा, बंगाल, आसाम ईशान्य भागात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोणत्याही विचित्र परिस्थितीला तोंड देण्यासाठी NDRF च्या 17 टीम आणि ODRAF च्या 20 टीम बाधित भागात तैनात करण्यात आल्या आहेत.
हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार, 11 मे पर्यंत जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब आणि जम्मू विभागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
त्याचवेळी दिल्लीत आजही उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. याशिवाय यूपी, बिहार आणि झारखंडसारख्या राज्यांमध्ये उष्णतेचा प्रकोप असेल, मात्र उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळेल.