महागाईचे मूळ केंद्रातच, मात्र राज्यावर हात झटकण्याचा प्रयत्न सुरु; जयंत पाटील

Published on -

मुंबई : राष्ट्रवादीचे (Ncp) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मीडियाशी (Media) बोलताना देशातील महागाईवरून केंद्र सरकारवर (central government) निशाणा साधला आहे.

जयंत पाटील म्हणाले, भारतात प्रचंड महागाई वाढलेली आहे. त्याचे दुष्परिणाम शेजारच्या देशात म्हणजे श्रीलंका (Sri Lanka) आणि पाकिस्तानमध्ये (Pakistan) पाहायला मिळत आहेत.

त्यामुळे देशातील महागाईची जबाबदारी राज्याराज्यावर टाकून हात झटकण्याचा प्रयत्न आहे. खरे महागाईचे (Inflation) मूळ केंद्रात आहे हे विसरता येणार नाही, अशा शब्दात त्यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे.

तसेच पुढे केंद्र सरकार कुठल्याही राज्याला आऊट ऑफ वे (Out of the way) जाऊन फारशी मदत करू शकत नाही. योजना असतात त्या योजनांवर पैसे येत असतात.

असे एकाच राज्याला जास्त पैसे देणे या ज्या घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) वेगवेगळ्या राज्यात जाऊन करतात मात्र तसे ते देऊ शकत नाहीत. पण काय करणार देशाचे पंतप्रधान बोलत असल्याने लोकं ऐकून घेतात, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे.

दरम्यान, भाजप व राष्ट्रवादी युतीबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले, शिवसेना होती म्हणून विरोध करण्याचा प्रश्न नव्हता. मुळात चर्चा झालीच नाही तर विरोध करण्याचा प्रश्न येतो कुठून? आमची काँग्रेसबरोबर आघाडी होती.

आमची आघाडी विरोधी पक्षाचे काम करत होती. त्यामुळे भाजपला आमच्याशी चर्चा करायची गरज का वाटली? असा उलट सवाल करत त्यांनी भाजपकडून सुरू असलेल्या युतीच्या चर्चेला उत्तर दिलं.

आमच्याशी भाजपने चर्चा का केली? त्यातून शिवसेनेला बाजूला करा असे म्हणत असू तर या सगळ्या हवेतील गप्पा आहेत. तुम्ही सत्तेत असताना, तुमच्याबरोबर तुमचा मित्र पक्ष असताना तुम्ही राष्ट्रवादीबरोबर चर्चा का केली? हा प्रश्न माझ्यावतीने भाजपला विचारा, असा सल्लाही जयंत पाटील यांनी मीडियाशी बोलताना दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe