आठवलेंची कवितेतून प्रतिक्रिया, म्हणाले, बळजबरीने आम्ही काढू देणार नाही मशिदीवरील भोंगे

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2022 Maharashtra news :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नव्या भूमिकेला भाजप पक्ष परिवाराकडून पाठिंबा मिळत आहे. मात्र, त्यांचा मित्र पक्ष असलेल्या आरपीआयने राज यांच्या या भूमिकेला सुरवातीपासूनच विरोध दर्शविला आहे.

केंद्रीय समाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यापूर्वीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.राज ठाकरे यांनी आज पुन्हा पुण्यात पत्रकार परिषद देऊन मशिदीवरील भोंगे उतरविण्याची मागणी सरकारकडे केली आहे.

यासाठी ३ मेपर्यंत मुदत देत आंदोलनाचा इशाराही दिला आहे. त्यासोबतच औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेण्याचीही घोषणा त्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर आठवले यांनी एक कविता आणि मुस्लिम कार्यकर्त्यांसोबतच फोटो ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे.

आठवले म्हणातात..

आरपीआय आहे हिंदू मुस्लिमांसंगे
पण लाऊडस्पीकरमुळे आम्ही होऊ देणार नाही दंगे
बळजबरीने आम्ही काढू देणार नाही मशिदीवरील भोंगे
वादाचे मुद्दे बाजूला सारून बंधुतेने राहा सर्वांनी एकमेकासंगे!

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe