मराठा बांधवांनो लक्ष द्या ! तुमच्या जुन्या कुणबी नोंदी ‘या’ ठिकाणी सापडतील

Published on -

Maharashtra News : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर ज्यांच्या नोंदी कुणी बी म्हणून सापडल्या आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मोहीम शासनाने उघडली. त्यामुळे जिल्ह्या जिल्ह्यानुसार कुणबी नोंदी सापडण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

हजारो लोकांच्या नोंदी सापडल्या असून त्यांना लवकरच सर्टिफिकेट दिले जाईल. दरम्यान अद्यापही काही मराठा बांधव कुणबी नोंदी शोधत आहेत. त्यांसाठी मोडीलिपी अभ्यासक डॉ. संतोष यादव यांनी माहिती दिली आहे की,

कुणबी प्रमाणपत्रासाठी आवश्यक असणारे पुरावे तुमच्या मूळ गावातच सापडतात. गावातील महसुली दप्तराच्या आधारे वंशावळ तुम्ही शोध, प्रशासनाला पुरावे सादर करा. यामुळे तुमचे काम सोपे होईल.

अहमदनगर मराठा उद्योजकांच्या वतीने कुणबी प्रमाणपत्राबाबत येथील कोहिनूर मंगल कार्यालयात आयोजित मार्गदर्शन शिबिरात त्यांनी याबाबत माहिती दिली. सध्या शासन पातळीवर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू असून समोर आलेले पुरावे स्कॅनिंग केले जातात.

त्यानंतर हे प्रसिध्द करण्यात येणार आहेत. यासाठी तुम्ही स्वतः कुणबी नोंदी शोधा, ते शोधताना महसुली दप्तराचा आधार तुम्हाला घ्यावा लागेल. खरेदीखत, सातबारा, उतारा, आठ ‘अ’ यांसारख्या कागदपत्रांचा अभ्यास करूनच वंशावळ काढावी.

सन १८८०पर्यंतच्या नोंदी मराठीत उपलब्ध आहेत. त्यामुळे पुरावे शोधताना अडचणी येत नाहीत. ही सर्व माहिती इतरत्र कुठेही मिळत नाही. ती आपापल्या गावातच मिळते. त्यामुळे मूळ गावात जाऊन महसुली पुरावा जमा करा

जेणेकरून तुम्हाला कसल्याही अडचणी येणार नाहीत. यामुळे कुणबी प्रमाणपत्राची प्रक्रियाही सुलभ होईल व अगदी कमी काळात तुम्हाला प्रमाणपत्र उपलब्ध होईल असे ते म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News