Maharashtra news:औरंगाबादच्या नामांतराला शिंदे सरकारने स्थगिती दिल्याच्या बातमीवरून राज्यभर वादळ उठले आहे. आता हा नेमका प्रकार काय आहे, हे स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच स्पष्ट केले आहे.
मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे झालेल्या एका कार्यक्रमात शिंदे म्हणाले, नामांतराला स्थगिती दिलेली नाही. संभाजीनगर हे नाव शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मुखातून निघाले आहे.

त्यामुळे उद्या सकाळीच कॅबिनेट बैठक घेऊन संभाजीनगर नावावर शिक्कामोर्तब करणार केले जाणार आहे. महाविकास आघाडी सरकारने शेवटच्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला. मात्र ती कॅबिनेट बैठकच अनधिकृत आहे.
कारण त्यावेळी सरकार अल्पमतात होते. उद्या सकाळी आम्ही कॅबिनेट बैठक घेऊन अधिकृतपणे या निर्णयावर शिक्कामोर्तब करणार आहोत. या निर्णयाला कोणी आव्हान देऊ नये, यासाठी काळजी घेण्यात येत आहे.