दोन दिवस एसटी प्रवास टाळाच, कारण…

Published on -

Maharashtra News:दसऱ्या निमित्त मुंबईत आयोजित शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या मेळाव्यांसाठी मोठ्या प्रमाणात एसटी आणि खासगी बसचे आरक्षण करण्यात आले आहे.

त्यामुळे सामान्य प्रवाशांसाठी बस कमी प्रमाणात उपलब्ध होणार असून त्यांचे हाल होण्याची शक्यता आहे. दोन्ही गटांनी मिळून सुमारे सव्वा तीन हजार बस आरक्षित केल्या आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा शिवाजी पार्कवर तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बीकेसी मैदानावर मेळावा होणार आहे. यामध्ये दोघांनाही शक्तिप्रदर्शन करायचे असल्याने राज्यभरातून कार्यकर्त्यांना आणण्यात येणार आहे.

यासाठी ठाकरे गटाने सुमारे चौदाशे तर शिंदे गटाने आठराशे बस बुक केल्या आहेत. यामघ्ये एसटी बसची संख्याही मोठी आहे. एसटीच्या आधीच बहुतांश बस नादुरूस्त आहे.

सणासुदीला वाढलेली गर्दीचा भार एसटीला पेलविता येत नाही, हे नवरात्रीत अनेक ठिकाणी दिसून आले. त्यातच आता मेळाव्यासाठी बस जाणार असल्याने प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी एसटीच्या आणि खासगी बसची संख्याही कमी राहणार आहे. याचा फटका दोन तीन दिवस सामान्य प्रवाशांना जाणवणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe