Maharashtra News : या पावसाळ्यात तापाने आधीच लोकांना हैराण केले आहे, आता देशभरात बर्ड फ्लूनेही लोकांना आजारी पाडायला सुरुवात केली आहे. झारखंडमध्ये नऊ महिन्यांची मुलगी या आजाराने बाधित असल्याचे समोर आले आहे.
डेंग्यू आणि मलेरियादरम्यान आता बर्ड फ्लूनेही एण्ट्री घेतली आहे. झारखंडमध्ये बर्ड फ्लूमुळे ९ महिन्यांच्या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिचा स्टॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला, ज्यामध्ये तिला बर्ड फ्लू असल्याची पुष्टी झाली. यावेळी तिच्यामध्ये बर्ड फ्लूची तीन प्रमुख लक्षणेही दिसून आली.
ही लक्षणे सर्वांनी ओळखणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ही लक्षणे वेळीच ओळखून उपचार सुरू केले नाहीत, तर रुग्णाचा जीवही जाऊ शकतो. अहवालानुसार, झारखंडची राजधानी रांची येथील राजेंद्र इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये उपचार घेत असलेल्या नऊ महिन्यांच्या मुलीला ‘बर्ड फ्लू’ची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे.
तीन विशेष लक्षणे
उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, मुलीला ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास (बर्ड फ्लू लक्षणे) सारखी लक्षणे होती. मुलीला आराम वाटला नाही, तेव्हा तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाळाच्या नाकाचा ‘स्टॅब’ तपासणीसाठी पाठवण्यात आला होता, त्यात ‘बर्ड फ्लू’ची पुष्टी झाली आहे.
लक्षणांकडे दुर्लक्ष नको
सर्वांनी आपल्या लहानग्यांना आणि मोठ्यांनी स्वतः ही मुलीला ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास या तीन लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. पावसाळ्यात ताप, खोकला सर्वसाधारण असला तरी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल; अन्यथा त्यातून होणारी गुंतागुंत आपल्याला बराच त्रास देऊन जाईल. त्यामुळे पावसाळ्यात कसल्याही आजारांच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे महाग पडू शकेल.