Bhagatsingh Koshyari : राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्यात अनेकदा वाद झाला. 12 आमदारांच्या नियुक्तीवरून देखील टोकाचे वाद झाले. आता याबाबत माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
ते म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ते पाच पानी पत्र पाठवलं नसत, तर मी दुसऱ्याच दिवशी १२ आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात मंत्रिमंडळाने केलेल्या शिफारशींवर सही करणार होतो, असे कोश्यारी यांनी म्हटले आहे. १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत महाविकास आघाडीची शिष्टमंडळं माझ्याकडे यायची.
मी त्यांना सांगितले की, हे पाच पानी पत्र बघा. पाच पानी पत्रात तुम्ही राज्यपालांना धमकी देत आहात. हा कायदा म्हणत धमकावत आहात. पत्रात लिहिले होते की, पुढील १५ दिवसांत मंजूर करा. कुठं लिहिलं आहे की, मुख्यमंत्री राज्यपालांना सांगू शकतात की हे एवढ्या दिवसांत मंजूर करा म्हणून, असेही ते म्हणाले.
तसेच असे कुठं लिहिलंय संविधानात. ते पत्र पाठवल नसत तर त्याच्या दुसऱ्या दिवशी मी १२ आमदारांच्या नियुक्तीच्या शिफारशींवर सही करणार होतो. राजकारणातील शरद पवार यांच्यासारख्या ट्रिक माहिती असत्या तर असे पत्र लिहिल असत का. चार ओळीचे पत्र लिहून पाठवल असत तर मला सही करावीच लागली असती, असेही कोशारी म्हणाले.
दरम्यान, उद्धव ठाकरे तर सज्जन माणूस आहेत, बिचारे राजकारणाच्या चक्रव्यूहात अडकले आहेत. ते कसे अडकले आहेत, हे तुम्हाला माहिती आहे का. पंधरा दिवसांत मंजूर करा, असं पत्र लिहिलं म्हणून मी बोललो, असेही कोशारी यांनी म्हटले आहे.